कृष्णप्रिया
नयनामध्ये मूर्ती तुझी
हृदयामध्ये भक्ती तुझी
सावळ्या भगवंता रे
कृष्णप्रिया मी तुझी सख्या रे
हृदयीचा तुला जाणिते
जन्मदा मी तुला मानिते
माय तू नी बाप तू रे
कृष्णप्रिया मी तुझी सख्या रे
जन्म ही तू दिला मला
कर्म ही हे तूची नेमीले
सर्व माझे तूही तू रे
कृष्णप्रिया मी तुझी सख्या रे
मनात माझ्या तूची वससी
असशी नित्य तेथ असती
हृदयस्थी नारायण रे
कृष्णप्रिया मी तुझी सख्या रे
छायाचित्र : कौस्तुभ यादव
© - स्वर_अनुश्री
०३/०५/२२
Bhavuk ❤️😊
ReplyDelete