Posts

अमृतधारा

पावसासारखा आहेस तू सोसाट्याच्या वा ऱ्या तून झरणा ऱ्या त्या संततधारे सारखा मावळतीच्या साक्षीने टपटप बरसणाऱ्या त्या थेंबासारखा सवयही अगदी सारखीच गडबडून धूसमूसत येतोस नखशिखांत भिजवून टाकतोस मला आणि कोण जाणे कशी मी पण लपून जाते तुझ्या बाहूपाशात त्या ओलेत्या अंगाने खऱ्या अर्थाने मीलन होतं तेव्हा तुझं आणि माझं... आणि मग विरहाने तप्त झालेल्या धरणीवर प्रेमाच्या अमृतधारा बरसू लागतात... © - स्वर_अनुश्री १८/०६/२०२२

कृष्णप्रिया

Image
नयनामध्ये मूर्ती तुझी हृदयामध्ये भक्ती तुझी सावळ्या भगवंता रे कृष्णप्रिया मी तुझी सख्या रे  हृदयीचा तुला जाणिते जन्मदा मी तुला मानिते माय तू नी बाप तू रे कृष्णप्रिया मी तुझी सख्या रे जन्म ही तू दिला मला कर्म ही हे तूची नेमीले सर्व माझे तूही तू रे कृष्णप्रिया मी तुझी सख्या रे मनात माझ्या तूची वससी असशी नित्य तेथ असती हृदयस्थी नारायण रे कृष्णप्रिया मी तुझी सख्या रे छायाचित्र : कौस्तुभ यादव  © - स्वर_अनुश्री       ०३/०५/२२

रात्र

ती चांदणी रात्र होती लपेटून घेतली | आसवांची माळ माझ्या त्वया कंठी घातली || रात्र होती धुंद आणि मंद होता गारवा | श्र्वास माझे गात होते धुंद कैफी मारवा || संधिकाली आज अश्या भेटल्या या सावल्या | अंतरीच्या भावना या तुझ्या पायी वाहिल्या || © - स्वर_अनुश्री       ३०/०१/२०२२

तीर्थरूप प्रिय विठू माऊली,

Image
तीर्थरूप प्रिय, विठू माऊली, मु. पो. पंढरी, सा. न. वि. वि. मायबापा, गेलं दिड वर्ष काही आपली प्रत्यक्ष भेट झाली नाही. तुला प्रत्यक्ष भेटायची, तुझं रूप माझ्या डोळ्यात साठवून ठेवायची इच्छा आता अनावर होतीये रे. तश्यात आता आषाढीला तर तुझी खूपच आठवण येत आहे. पण काय करणार? सद्य परिस्थितीत आपले तुकोबाराय म्हणतात तद्वत - ठायीच बैसुनी करा एकचित्त | आवडी अनंत आळवावा...|| घरीच बसून उपासना करणे व वारीचा आनंद घेणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. गेलं वर्ष दिड वर्ष या साऱ्या विश्वाचा डोलारा अगदी कोलमडून पडलाय. आणि माहितीये मला.. तू तुझ्याच खांद्यावर तो उचलून धरलायस ते! तू आहेस म्हणून मी आज हे पत्र तुला लिहू शकते. भक्तांचं संरक्षण करायचं, त्यांचा संसार चालवायचं ब्रीद चं आहे तुझं. दामाजी पंत, जनाई, नामदेव, तुकाराम यांसारख्या संत श्रेष्ठांची उदाहरणं माहित आहेतच आम्हाला. पण गेलं वर्ष दिड वर्ष तुला तुझं ब्रीद सांभाळताना बघतोय आम्ही! तुझ्याच आशीर्वादाने आपण भेटूच आता लवकर.. स्वतःची काळजी घे! तोवर तुझी इथूनच मानसपूजा करतो आम्ही.. अशीच कृपादृष्टी आम्हावर ठेव! पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार! तुझीच! स्वर_अनु...

तू

बाहेर पाऊस पडायला लागला की मनात अशी चलबिचल सुरु होते. पावसाची एक एक सर जशी झरझरून पडते तसा सरसरून अंगावर रोमांच उभा राहतो. रोमारोमातून सळसळत एक तीव्र आस येते मनात. तुझ्या भेटीची. असंच करतोस नेहमी तू. मनात आस वाढवतोग सारखी. भेटत तर नाहीसच. आणि मग अचानक कधीतरी समोर येऊन उभा राहतोस आगापिछा काहीच नसताना. आणि वर हसतोस माझ्याकडे बघून! असा राग येतो ना तेव्हा.. पण मग अचानक मागे लपवलेली निशिगंधाची गुलछडी पुढे करतोस माझ्या.  मला निशिगंध फार फार आवडतो. कसं रे लक्षात राहतं तुझ्या ? गुलछडी बघून राग कुठच्या कुठे पळतो माझा.. नकळत एक लाजेची घटा उभी राहने गालावर माझ्या.बघतच राहतोस फक्त तु. तुझी नजर खिळलेली असते माझ्यावर. मी नजरेच्या कोपऱ्यातून तुला बघत असते, नजरेला नजर मिळवता येत नाहीच मला, पण तरी मी चोरुन तुझ्या चेहऱ्यावरचे भाव टिपत असते, मला आवडणारा तो काळा शर्ट किती किती खुलून दिसतो तुला! आणि माहिती आहे ना तुला मला तो शर्ट आवडतो ते ? म्हणूनच मला भेटायला येताना काळाच शर्ट घालून येतोस. मलाही खूपच आवडतं म्हणा ते. आणि एक ने तुझं हट्ट असतो तुझा मी केस मोकळेच ठेवायचे. असा बघत बसतोस माझ्या केसांकडे आणि...

तेजोमय सावरकर

Image
कितीतरी सुललित सहज गीती तार न बहु ताणी | ताणीशी तनु बीन तुटे शिथिल तरी गीती नुठे | अति ते ते करत हानी || मराठी साहित्य आणि रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं आणि अजूनही मराठी रसिक आणि देशभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं नाव म्हणजे महाकवी-नाटककार-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! देहाकडून देवाकडे जाताना मध्ये माझा देश लागतो आणि या देशाचे मी देणे लागतो! या एका वाक्यामध्ये ओतप्रोत देशभक्तीचा आविष्कारर दिसून येतो. सावरकरांच्या लेखणीतून अवतरलली गीते-नाटके-साहित्य यामध्ये एक वेगळी वक्त, जिद्द, आशा आणि देशभक्ती भरलेली असते. भारताच्या इतिहासात दुसऱ्या कोणत्याही क्रांतिकारकाला न मिळालेव ली पन्नास वर्षे काळ्यापाण्याची तीव्र शिक्षा, अंदमानातील त्या भयानक तुरुंगामध्ये झालेले अनन्वित शारीरिक छळ सोसूनही "या तुरुंगात येऊन मला एक वर्ष झाले आहे, आणि पुढची एकोणपन्नास वर्ष मी या तुरुंगात काढणार आहे. पण मी या तुरुंगात असेपर्यंत माझ्या भारत भूमीवर या इंग्रजांचे सरकार टिकून राहणार आहे काय?" असे ते नेहमीच म्हणत. सर्व कष्ट, हाल-अपेष्टा सोसत असताना मातृभूमीच्या ओढीने घेतलेली सागरी झेप...

संगीत मानापमान

Image
आज संध्याकाळचा क्लास झाल्यानंतर तशी free च होते मी. एखादं पुस्तक घेऊन वाचत बसावं असा विचार करत असताना मला माझ्या गुरु डॉ. वंदना घांगुर्डे दीदी यांचा फोन आला. "अगं अनुश्री, संह्याद्री लाव आपलं नाटक "संगीत मनापमान" लागलं आहे. तुला चंदू डेगवेकर नानांना बघायचं आहे ना? लवकर लाव बरं नाटक!" अर्थात क्षणाचाही विलंब नं करता मी संह्याद्री लावलं. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या तेजस्वी लेखणीतून अवतरलेलं आणि गोविंदराव टेंबे यांच्या संगीताचं लेणं ल्यालेलं अजरामर नाटक "संगीत मानापमान"! नाटक लावल्या लावल्या ऐकायला मिळालं ते "धैर्यधरांचं" "चंद्रिका ही जणू". माझे गुरु डॉ. रवींद्र घांगुर्डे गुरुजी यांनी साकारलेली धैर्यधरांची भूमिका आणि धैर्यधरांची सर्वच पदे आम्हां सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक सुखद पर्वणीचं असते. "मा. दीनानाथ मंगेशकर" यांनी साकारलेली धैर्यधरांची भूमिका, आणि धैर्यधरांची पदे, यांबद्दल आम्ही आमच्या गुरुजींकडून नेहमीच ऐकत आणि शिकत असतो. मा. दीनानाथ मंगेशकरांचा अलौकिक दैवी सुर साऱ्या विश्वावर राज्य करीत आहे. "चंद्रिका ही जणू...