रात्र

ती चांदणी रात्र होती लपेटून घेतली |
आसवांची माळ माझ्या त्वया कंठी घातली ||

रात्र होती धुंद आणि मंद होता गारवा |
श्र्वास माझे गात होते धुंद कैफी मारवा ||

संधिकाली आज अश्या भेटल्या या सावल्या |
अंतरीच्या भावना या तुझ्या पायी वाहिल्या ||

© - स्वर_अनुश्री
      ३०/०१/२०२२

Comments

  1. Wah...
    वाचल्यावर सुचलेलं खाली रेखाटतोय...


    रात वाटे अनामिक...
    पण त्या चंद्रावर भासे ओळखीची साज...
    गोठले पृथ्वी वर शब्द माझे...
    त्या चांदण्याचा पल्याड तुझी-माझी हितगुज...
    - अनि_लिखित

    ReplyDelete
  2. अप्रतिम 👌👌
    All the best

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कैवल्यगान

तेजोमय सावरकर