तीर्थरूप प्रिय विठू माऊली,
तीर्थरूप प्रिय,
विठू माऊली,
मु. पो. पंढरी,
सा. न. वि. वि.
मायबापा,
गेलं दिड वर्ष काही आपली प्रत्यक्ष भेट झाली नाही. तुला प्रत्यक्ष भेटायची, तुझं रूप माझ्या डोळ्यात साठवून ठेवायची इच्छा आता अनावर होतीये रे. तश्यात आता आषाढीला तर तुझी खूपच आठवण येत आहे. पण काय करणार? सद्य परिस्थितीत आपले तुकोबाराय म्हणतात तद्वत -
ठायीच बैसुनी करा एकचित्त |
आवडी अनंत आळवावा...||
घरीच बसून उपासना करणे व वारीचा आनंद घेणे आम्हाला क्रमप्राप्त आहे.
गेलं वर्ष दिड वर्ष या साऱ्या विश्वाचा डोलारा अगदी कोलमडून पडलाय. आणि माहितीये मला.. तू तुझ्याच खांद्यावर तो उचलून धरलायस ते! तू आहेस म्हणून मी आज हे पत्र तुला लिहू शकते. भक्तांचं संरक्षण करायचं, त्यांचा संसार चालवायचं ब्रीद चं आहे तुझं. दामाजी पंत, जनाई, नामदेव, तुकाराम यांसारख्या संत श्रेष्ठांची उदाहरणं माहित आहेतच आम्हाला. पण गेलं वर्ष दिड वर्ष तुला तुझं ब्रीद सांभाळताना बघतोय आम्ही!
तुझ्याच आशीर्वादाने आपण भेटूच आता लवकर.. स्वतःची काळजी घे! तोवर तुझी इथूनच मानसपूजा करतो आम्ही.. अशीच कृपादृष्टी आम्हावर ठेव!
पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार!
तुझीच!
स्वर_अनुश्री
२०/०७/२०२१
😍❤️💯...
ReplyDelete🙏🙏
ReplyDelete🙏🤭
ReplyDelete🙏❤️
ReplyDelete🙏🙏
ReplyDeleteहोय महाराजा 🙏.
ReplyDeleteखूप खूप छान. ताईच्या गाण्याने कालची एकादशी साजरी झाली आणि तुझ्या या पत्रातून आपल्या सगळ्यांच्या काळजाची साद माऊली पर्यंत पोहोचती झाली.
पांडुरंग हरी 🙏
🙏🔥हरि ओम विठ्ठला 🔥🙏
ReplyDeleteखूप खूप सुंदर लिखाण..