तू

बाहेर पाऊस पडायला लागला की मनात अशी चलबिचल सुरु होते. पावसाची एक एक सर जशी झरझरून पडते तसा सरसरून अंगावर रोमांच उभा राहतो. रोमारोमातून सळसळत एक तीव्र आस येते मनात. तुझ्या भेटीची. असंच करतोस नेहमी तू. मनात आस वाढवतोग सारखी. भेटत तर नाहीसच. आणि मग अचानक कधीतरी समोर येऊन उभा राहतोस आगापिछा काहीच नसताना. आणि वर हसतोस माझ्याकडे बघून! असा राग येतो ना तेव्हा.. पण मग अचानक मागे लपवलेली निशिगंधाची गुलछडी पुढे करतोस माझ्या.  मला निशिगंध फार फार आवडतो. कसं रे लक्षात राहतं तुझ्या ? गुलछडी बघून राग कुठच्या कुठे पळतो माझा.. नकळत एक लाजेची घटा उभी राहने गालावर माझ्या.बघतच राहतोस फक्त तु. तुझी नजर खिळलेली असते माझ्यावर. मी नजरेच्या कोपऱ्यातून तुला बघत असते, नजरेला नजर मिळवता येत नाहीच मला, पण तरी मी चोरुन तुझ्या चेहऱ्यावरचे भाव टिपत असते, मला आवडणारा तो काळा शर्ट किती किती खुलून दिसतो तुला! आणि माहिती आहे ना तुला मला तो शर्ट आवडतो ते ? म्हणूनच मला भेटायला येताना काळाच शर्ट घालून येतोस. मलाही खूपच आवडतं म्हणा ते. आणि एक ने तुझं हट्ट असतो तुझा मी केस मोकळेच ठेवायचे. असा बघत बसतोस माझ्या केसांकडे आणि बांधलेच जर केस तर मोठे मोठे बटाट्याएवढे डोळे करून बघतोस माझ्याकडे. भिती नाही वाटत, अजूनच प्रेमात पडते मी तुझ्या. माझा हात हातात घट्ट धरून बसलेला असतोस तु. लाजूनच तो हात सोडवून घ्यायचा निष्फळ प्रयत्न करते खरा मी, तुझी पकड़ अजूनच घट्ट होते पण मग मी प्रयत्न सोडून देते. बाहेर पाऊस झरतच असतो अथक अविरत. कातरवेळ होते. तसा निघतोस तू. डोळ्यात पाणी तरारत माझ्या. तुझा हात धरून परत कधी भेटशील म्हणत मी रडू आवरते. तसा समोर येऊन बसतोस, तुझ्या हाताने माझे डोळे पुसून काहीच न बोलता निघून जातोस. बाहेर पाऊस पडतच असतो. माझ्या नजरेतही पाऊस पडू लागतो, पावसाची ही सर मात्र सतत हवीशी वाटते. आणि मी वाट पहात राहते. परत असा पाऊस कधी पडेल याची. की परत तू कधी येशील याची ? बहुधा दोन्हीची! हो हो. होन्हींची!

© - स्वर_अनुश्री
    २०/०९/२०२०

Comments

  1. Mast😍 keep writing📝 👍

    ReplyDelete
  2. Wahhhhh💯❤️❤️❤️💫
    Kasala bhariee lihilaye tai tu💞💞Ekdammm bhari ch g ...
    Ani tyat bhaav pn ekdam correct taklet💯💯😍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कैवल्यगान

रात्र

तेजोमय सावरकर