तेजोमय सावरकर
कितीतरी सुललित सहज गीती तार न बहु ताणी |
ताणीशी तनु बीन तुटे शिथिल तरी गीती नुठे |
अति ते ते करत हानी ||
मराठी साहित्य आणि रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं आणि अजूनही मराठी रसिक आणि देशभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं नाव म्हणजे महाकवी-नाटककार-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! देहाकडून देवाकडे जाताना मध्ये माझा देश लागतो आणि या देशाचे मी देणे लागतो! या एका वाक्यामध्ये ओतप्रोत देशभक्तीचा आविष्कारर दिसून येतो. सावरकरांच्या लेखणीतून अवतरलली गीते-नाटके-साहित्य यामध्ये एक वेगळी वक्त, जिद्द, आशा आणि देशभक्ती भरलेली असते.
भारताच्या इतिहासात दुसऱ्या कोणत्याही क्रांतिकारकाला न मिळालेव ली पन्नास वर्षे काळ्यापाण्याची तीव्र शिक्षा, अंदमानातील त्या भयानक तुरुंगामध्ये झालेले अनन्वित शारीरिक छळ सोसूनही "या तुरुंगात येऊन मला एक वर्ष झाले आहे, आणि पुढची एकोणपन्नास वर्ष मी या तुरुंगात काढणार आहे. पण मी या तुरुंगात असेपर्यंत माझ्या भारत भूमीवर या इंग्रजांचे सरकार टिकून राहणार आहे काय?" असे ते नेहमीच म्हणत. सर्व कष्ट, हाल-अपेष्टा सोसत असताना मातृभूमीच्या ओढीने घेतलेली सागरी झेप, आणि यशस्वी पलायन! राजकारण संन्यास या अटीवर कशीबशी त्यांची सुटका झाली खरी, पण तद्नंतर ते रत्नागिरी येथे श्रीमान नारायणराव पटवर्धन यांच्या घरी (माझ्या गुरु डॉक्टर वंदना घांगुर्डे यांचे आजोबा) नजरकैदेत होते.
सावरकरांनी लिहिलेली नाटके ही हातात बंदुका घेण्यास प्रवृत्त करणारी होती. "प्रेयसीच्या केसांतून फिरणारी बोटे जेव्हा बंदुकांच्या चापांवरून फिरतील तेव्हाच हिंदुस्थान जगू शकेल." त्यांच्या नाटकांमधून त्यांचे प्रखर विचार आणि देशभक्ती ओथंबलेली दिसून येते. सावरकरांच्या तेजस्वी लेखणीतून अशी तीन नाटके अवतरली. संगीत उ:शाप, संगीत उत्तरक्रिया, संगीत संन्यस्त खड्ग!
संगीत उ:शाप या नाटकातून सावरकरांनी अस्पृश्यता निवारण आणि बाटलेल्या हिंदूंचे शुद्धीकरण या विषयावर समाजजागृती केली आहे.
संगीत उत्तरक्रिया नाटकात राष्ट्राच्या अपमानचा बदला हा विषय मांडला आहे. 'मला उत्तरक्रिया करायची आहे. दळभार हवे' या वाक्यातून जिथे आवश्यक तिथे शस्त्रे उचलून सज्ज व्हावेच लागते असे सांगितले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची तेजस्वी लेखणी आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे दैवी सुर यांचा अद्वितीय मिलाफ म्हणजेच संगीत संन्यस्त खड्ग! संगीत संन्यस्त खड्ग या नाटकामध्ये हिंसा आणि अहिंसा यावर भाष्य केले आहे. राष्ट्राने शस्त्रबळाची उपेक्षा करू नये हा मोठा संदेश या नाटकातून दिला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची भाषा खूप तेजस्वी होती. सावरकरांनी काही शब्दांना पर्यायी मराठी शब्द रोजच्या मराठी बोलीभाषेमध्ये रुढ केले. अनुज्ञप्ती - परवाना, स्थंडील - यज्ञकुंड, दळभार - सैन्य, आगार-स्थानक हे सावरकरांनीच मराठीमध्ये रूढ केलेले शब्द आहेत.
सावरकरांच्याबद्दल बोलणं खरं तर खूपच अवघड आणि खूप मोठी गोष्ट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त परवा म्हणजेच दिनांक २६ मे या दिवशी आमच्या नादब्रह्म परिवार व अनाहत संगीत अकादमीच्या मासिक पौर्णिमा संगीत सभेमध्ये नादब्रह्म पुणे प्रस्तुत - सावरकर नाट्यरंग ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संगीत उ:शाप, संगीत उत्तरक्रिया, आणि संगीत संन्यस्त खड्ग या नाटकातील नाट्य पदांची बहारदार मैफिल सादर झाली. याच मैफिलीमध्ये माझे गुरु डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे आणि सावनी रवींद्र ताई यांच्या कृपेमुळे मला निवेदन करण्याची संधी प्राप्त झाली. निवेदन करत असताना खरंतर थोडीशी भीती वाटत होती. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर या एवढ्या अवलिया व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलायचं म्हणजे नक्की बोलायचं तरी किती आणि काय? हा एकच प्रश्न माझ्या डोक्यात होता. मी कुठेतरी अडखळणार तर नाही ना? किंवा सावरकरांबद्दल बोलताना माझं काही चुकणार तर नाही ना अशा अनेक गोष्टी माझ्या डोक्यात तेव्हा होत्या. पण त्या भीती मधून मार्ग काढून मी थोडं थोडं जमेल तसं बोलायचा प्रयत्न करत होते. माझ्या गुरु डॉ. वंदना घांगुर्डे दीदी आम्हाला नेहमीच सांगतात, नाटक चालु असताना नेहमी मास्टर दीनानाथ मंगेशकर, डॉक्टर वसंतराव देशपांडे, पंडित कुमार गंधर्व, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर, कृष्णराव कोल्हापुरे, नटसम्राट बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गडकरी मास्तर, अण्णासाहेब किर्लोस्कर ही दिग्गज आणि अवलिया मंडळी समोरच्या खुर्च्यांमध्ये बसून नाटक बघत आहेत व आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे मला नेहमी वाटते. तसाच काहीसा अनुभव मला या मैफिलीतूनही आला. मी बोलत असताना समोर ठेवलेला स्वा. सावरकरांचा पुतळा आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची तसबीर यांच्या जागी प्रत्यक्ष ते स्वतः बसले असल्याचा आणि माझ्याकडे पाहत असल्याचा भास मला होत होता. आतापर्यंत अर्थात गुरुकृपेमुळे ज्या काही मैफिलींमध्ये माझी तोडकी मोडकी सेवा मला रुजू करण्याची संधी मिळाली त्यातील ही माझी अविस्मरणीय मैफिल आहे. गुरु हा नेहमीच आपल्या शिष्याला मार्ग दाखवत असतो, सतत त्यावर लक्ष ठेवुन असतो असं तात (डॉ. रवींद्र घांगुर्डे गुरुजी) नेहमीच म्हणतात. त्याचीच अनुभूती या मैफिलीतून आली. डॉ. रवींद्र घांगुर्डे गुरुजी, डॉ. वंदना घांगुर्डे दीदी आणि सावनी रवींद्र ताई मला ही संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद!
महाकवी - नाटककार - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दैवी स्मृतींना विनम्र अभिवादन!
गुरुचरणी सादर वंदन!
(सावरकर नाट्यरंग या नाटकातील एक फोटो share करत आहे.
गायिका - माझ्या गुरु डॉ. वंदना घांगुर्डे
तबला - दुर्वांकुर कुलकर्णी व योगेश गिरी
संवादिनी - दर्शन कुलकर्णी
फोटो credits - इंझमाम बारगीर)
© स्वर_अनुश्री
२८/०५/२०२१
उत्तम 👌😁
ReplyDelete🤗❤️छान भावना प्रदर्शन
ReplyDeleteMastch
ReplyDeleteKup chan😁👍
ReplyDeleteतुझ्या मनातल्या भावना खूप छान प्रकारे मांडल्या आहेस तू , अप्रतिम आणि छान मांडणी❤️🤩
ReplyDeleteखूप छान, आमच्या सर्वांच्या भावना तुझ्या लिखाणातून प्रकट झाल्या आहेत असं वाटतंय. तू नेहमीच छान लिहितेस अगदी मोजक्या शब्दांत पण सर्वांगीण मांडतेस. खूप खूप शुभेच्छा.
ReplyDeleteखूप छान लिहिलात.
ReplyDelete1no 👌❤️
ReplyDeleteखुप छान लिहिलं आहेस...👌👌❤
ReplyDelete👌
ReplyDeleteखूप खूप खूप म्हणजे खूपच भारी लिहिलंय...🔥🔥🔥
ReplyDelete