जादू

बऱ्याच दिवसांनी भेटलो होतो त्या दिवशी. बोलायचंच नाही मुळी तुझ्याशी असं ठरवलं होतं मी. येशील तू समोर आणि मी अश्शी रुसून बसेन. बघणार ही नाही तुझ्याकडे. तू ही मग नाराज होशील. नजरेच्या कोपऱ्यातून मी हळूच बघेन तुला. उतरलेला चेहेरा तुझा बघून वाईट वाटेल मला. चेहेऱ्यावर गोड हसू आणून हळूच बघेन मी तुझ्याकडे. तू ही मग हसशील. खोट्या आवेगाने माझ्याकडे बघशील. तुझी ती नजर चुकवून मी पण मग तुझ्या बाहुपाशात हरवून जाईन. उंच आहेस ना तू खूप. मी बुटकी आहे म्हणून नाराज होईन मी. आणि "अगं वेडे तू अशीच खूप सुंदर दिसतेस" असं म्हणून तू माझी समजूत घालशील. माझे लांबसडक केस तूझ्या हाताने हलकेच मोकळे करून तू बघत राहशील फक्तं त्यांच्याकडे. मधूनच एखादी बट चेहेऱ्यावर आलीच जर माझ्या तर तिलाही तुझ्या बोटाने अलगद मागे सारून माझ्याकडेच बघत बसशील तू. पापणीही नं लवता. आणि "असा का बघतोयस तू माझ्याकडे?" असं म्हणून मी हलकेच माझ्या दोन्ही हातानी माझा चेहेरा झाकून घेईन. मग आवेगात माझे हात बाजूला सारून माझ्या चेहेऱ्यावरचे हावभाव टीपशील तू. डोळे मिटलेलेच असतील माझे लाजेने. हळूच मला ओढून घेशील तुझ्याजवळ. आणि.. आणि.. यद्वत नदी आणि समुद्र जसे एक होऊन जातात, तद्वतच काहीतरी होऊन जाईल. 

स्वप्नातच रमून गेले होते मी, आणि दारावर बेल वाजली. घाईघाईत मी माझे केस ठीक केले. आरशात बघून जरा टिकली सारखी केली. हृदयाची धडधड वाढत होती. जवळ जवळ पळत येऊन मी दार उघडलं. असं का करतोस रे तू? तो काळा शर्ट खूपच सुंदर दिसतो तुझ्यावर. मग माझा स्वतःवर ताबा रहात नाही. चिडायचं होतं ना रे मला तुझ्यावर.. आता कसची चिडतेय मी. आलास तू आत. आणि एकदम मला ओढून घेतलंस तुझ्या मिठीत. बऱ्याच दिवसांची आर्तता भरलेली होती त्या मिठीत. मी पण विरघळून गेले मग. असंच करतोस नेहमी तू. काहीतरी ठरवलेलं असतं मी मनाशी, तू येतोस आणि भलतंच काहीतरी करून जातोस. एकदम जादूची कांडी फिरवल्यासारखं.

© - स्वर_अनुश्री 
०९/०२/२०२१

Comments

  1. प्रेमाची जादू असतेच निराळी!!! ❤️💕❣️I love you Anushree, keep writing. Would love to read more stuff like this

    ReplyDelete
  2. शेवट सुंदर जमलाय!! 🥰😍

    ReplyDelete
  3. शेवट सुंदर जमलाय!! 🥰😍

    ReplyDelete
  4. शेवट सुंदर जमलाय!! 🥰😍

    ReplyDelete
  5. You always take me into your writing, those detailing you do are amazing keep posting 🥳🥳

    ReplyDelete
  6. अफलातून....वाचताना फार कमी वेळा असं होतं की आपण त्यात हरवून जातो किंबहुना लिहिलेलं सर्व स्वतःसोबतंच घडतंय असं वाटतं. तुझ्या लिखाणात हि गोष्ट नेहमी जाणवते. अशीच लिहित रहा.

    ReplyDelete
  7. That's fab! KY was beautiful... The 3nd was the real fun.... Loved it 🤩🤩🤩

    ReplyDelete
  8. Khup sundar lihilays anushree ❤❤❤

    ReplyDelete
  9. खरंच... जादू... असतेच एखाद्याच्या सहवासाची....✒️💗
    आणि त्यातलच काहीस तुझ्या लिखाणाचं ही आहे..... अगदी जादू सारखंच लिहतेस.... खूप छान 💯💯😇

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कैवल्यगान

रात्र

तेजोमय सावरकर