शब्दांचीच रत्ने
संगीत आणि साहित्य (त्यातही खास कविता) दोन्ही माझे जीव की प्राण आहेत! अर्थातच कालची सावनी ताईची शब्दांचीच रत्ने ही मैफिल एक विलक्षण आनंद देऊन गेली. मराठी कवींच्या अजरामर कविता आणि सुमधुर गीतांचा एक बहारदार नजराणाच होता तो.
खरंतर सावनी ताईकडून कोणतंही गाणं ऐकलं तरी ते प्रत्येक वेळी नवीनच वाटतं. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन खुबी उलगडून दाखवते ताई. गुलाबी रंगाच्या नाजूक पाकळ्या रांगोळीवर अलगद पसरत जाव्यात तशीच अलगद पणे एक एक गाणं ताई सादर करते. आणि प्रत्येक गाण्यासरशी रसिकांच्या मनामध्ये अलगद घर करते. मग ते भावगीत - भक्तीगीत असो, चित्रपट संगीत असो, अनप्लग्ड व्हर्जन असो किंवा ठसकेदार लावणी असो. यातल्या कोणत्याही बाजाचं गाणं ताईकडून ऐकताना त्यातलं नावीन्य मनाला भावतं! ताईचे साथीदार नितीन दादा, अनय दादा, अभिजीत दादा हे देखील त्यांच्या लकबींमुळे रसिकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करतात.
पण कालची मैफिल मात्र वेगळीच होती. मैफिलीचा मूळ गाभच मुळी निराळा होता. अजरामर कवीच्या अजरामर कविता आणि सुमधुर गीतांचा नजराणा! सावनी ताईची एक सुंदर कल्पना. हे शिवधनुष्य ताई एकदम समर्थपणे पेलते. आणि सोबतीला कोरस कलाकार ही छान साथ देत होते. आपल्या मित्रांना रंगमंचावर सादरीकरण करताना बघणं ही एका मैत्रिणीसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट असते. Indeed I'm a proudest best friend!
मैफिलीत अनेक दिग्गज कवीच्या कविता आणि त्यांच्या गीतांची सुंदर गुंफण होती. कवितेतून गीत आणि गीतातून कविता अशी सुंदर काव्य-गीत माला ताईने गुंफली. आणि सोबतीला कवी-गीतकार वैभव जोशी दादा यांचं काव्य वाचन आणि दीप्ती भागवत ताईच निवेदन! कालची मैफिल एक खूप वेगळी अनुभूती होती.
कविता आवडणं, कविता करणं, कविता समजणं म्हणजे नक्की काय हे कालच्या मैफिलीतून हळूहळू समजू लागलंय आता. कविता म्हणजे -
"शब्दांतील राधेसाठी शब्दांतून कान्हा यावा
शब्दांच्या यमुनेकाठी शब्दांचा रास सजावा "
कवितेचा याहून छान परिचय कसा होईल? कवितेशी नव्याने नातं जुळलं काल.
माझं संगीत आणि कविता दोन्हीशी असलेलं नातं आणखीनच दृढ केलं या मैफिलीने. Thanku so much सावनी ताई, तात आणि दीदी..🙏❤️
© - स्वर_अनुश्री
१/२/२०२१
❤️❤️❤️
ReplyDeleteHats off to this..... The way u write... The way the detailings are done, oh lord.. This is really fab... I would like to mention a thing here...u r the real inspiration for me to go on writing. I have cherished this skill with ua help... Thanks diiiii... Keep writing... Keep inspiring... Miss u all a lot 😍😍😍
ReplyDeleteThanku brother ❤️
Delete🙏👍👍👌👌👌
ReplyDelete❤❤❤❤❤❤💯💯
ReplyDeleteअतिशय योग्य पद्धतीने मांडणी केली आहे 👌 खरोखर शब्दांचीच रत्ने 😊😊
ReplyDelete