Posts

तीर्थरूप प्रिय विठू माऊली,

Image
तीर्थरूप प्रिय, विठू माऊली, मु. पो. पंढरी, सा. न. वि. वि. मायबापा, गेलं दिड वर्ष काही आपली प्रत्यक्ष भेट झाली नाही. तुला प्रत्यक्ष भेटायची, तुझं रूप माझ्या डोळ्यात साठवून ठेवायची इच्छा आता अनावर होतीये रे. तश्यात आता आषाढीला तर तुझी खूपच आठवण येत आहे. पण काय करणार? सद्य परिस्थितीत आपले तुकोबाराय म्हणतात तद्वत - ठायीच बैसुनी करा एकचित्त | आवडी अनंत आळवावा...|| घरीच बसून उपासना करणे व वारीचा आनंद घेणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. गेलं वर्ष दिड वर्ष या साऱ्या विश्वाचा डोलारा अगदी कोलमडून पडलाय. आणि माहितीये मला.. तू तुझ्याच खांद्यावर तो उचलून धरलायस ते! तू आहेस म्हणून मी आज हे पत्र तुला लिहू शकते. भक्तांचं संरक्षण करायचं, त्यांचा संसार चालवायचं ब्रीद चं आहे तुझं. दामाजी पंत, जनाई, नामदेव, तुकाराम यांसारख्या संत श्रेष्ठांची उदाहरणं माहित आहेतच आम्हाला. पण गेलं वर्ष दिड वर्ष तुला तुझं ब्रीद सांभाळताना बघतोय आम्ही! तुझ्याच आशीर्वादाने आपण भेटूच आता लवकर.. स्वतःची काळजी घे! तोवर तुझी इथूनच मानसपूजा करतो आम्ही.. अशीच कृपादृष्टी आम्हावर ठेव! पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार! तुझीच! स्वर_अनु...

तू

बाहेर पाऊस पडायला लागला की मनात अशी चलबिचल सुरु होते. पावसाची एक एक सर जशी झरझरून पडते तसा सरसरून अंगावर रोमांच उभा राहतो. रोमारोमातून सळसळत एक तीव्र आस येते मनात. तुझ्या भेटीची. असंच करतोस नेहमी तू. मनात आस वाढवतोग सारखी. भेटत तर नाहीसच. आणि मग अचानक कधीतरी समोर येऊन उभा राहतोस आगापिछा काहीच नसताना. आणि वर हसतोस माझ्याकडे बघून! असा राग येतो ना तेव्हा.. पण मग अचानक मागे लपवलेली निशिगंधाची गुलछडी पुढे करतोस माझ्या.  मला निशिगंध फार फार आवडतो. कसं रे लक्षात राहतं तुझ्या ? गुलछडी बघून राग कुठच्या कुठे पळतो माझा.. नकळत एक लाजेची घटा उभी राहने गालावर माझ्या.बघतच राहतोस फक्त तु. तुझी नजर खिळलेली असते माझ्यावर. मी नजरेच्या कोपऱ्यातून तुला बघत असते, नजरेला नजर मिळवता येत नाहीच मला, पण तरी मी चोरुन तुझ्या चेहऱ्यावरचे भाव टिपत असते, मला आवडणारा तो काळा शर्ट किती किती खुलून दिसतो तुला! आणि माहिती आहे ना तुला मला तो शर्ट आवडतो ते ? म्हणूनच मला भेटायला येताना काळाच शर्ट घालून येतोस. मलाही खूपच आवडतं म्हणा ते. आणि एक ने तुझं हट्ट असतो तुझा मी केस मोकळेच ठेवायचे. असा बघत बसतोस माझ्या केसांकडे आणि...

तेजोमय सावरकर

Image
कितीतरी सुललित सहज गीती तार न बहु ताणी | ताणीशी तनु बीन तुटे शिथिल तरी गीती नुठे | अति ते ते करत हानी || मराठी साहित्य आणि रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं आणि अजूनही मराठी रसिक आणि देशभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं नाव म्हणजे महाकवी-नाटककार-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! देहाकडून देवाकडे जाताना मध्ये माझा देश लागतो आणि या देशाचे मी देणे लागतो! या एका वाक्यामध्ये ओतप्रोत देशभक्तीचा आविष्कारर दिसून येतो. सावरकरांच्या लेखणीतून अवतरलली गीते-नाटके-साहित्य यामध्ये एक वेगळी वक्त, जिद्द, आशा आणि देशभक्ती भरलेली असते. भारताच्या इतिहासात दुसऱ्या कोणत्याही क्रांतिकारकाला न मिळालेव ली पन्नास वर्षे काळ्यापाण्याची तीव्र शिक्षा, अंदमानातील त्या भयानक तुरुंगामध्ये झालेले अनन्वित शारीरिक छळ सोसूनही "या तुरुंगात येऊन मला एक वर्ष झाले आहे, आणि पुढची एकोणपन्नास वर्ष मी या तुरुंगात काढणार आहे. पण मी या तुरुंगात असेपर्यंत माझ्या भारत भूमीवर या इंग्रजांचे सरकार टिकून राहणार आहे काय?" असे ते नेहमीच म्हणत. सर्व कष्ट, हाल-अपेष्टा सोसत असताना मातृभूमीच्या ओढीने घेतलेली सागरी झेप...

संगीत मानापमान

Image
आज संध्याकाळचा क्लास झाल्यानंतर तशी free च होते मी. एखादं पुस्तक घेऊन वाचत बसावं असा विचार करत असताना मला माझ्या गुरु डॉ. वंदना घांगुर्डे दीदी यांचा फोन आला. "अगं अनुश्री, संह्याद्री लाव आपलं नाटक "संगीत मनापमान" लागलं आहे. तुला चंदू डेगवेकर नानांना बघायचं आहे ना? लवकर लाव बरं नाटक!" अर्थात क्षणाचाही विलंब नं करता मी संह्याद्री लावलं. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या तेजस्वी लेखणीतून अवतरलेलं आणि गोविंदराव टेंबे यांच्या संगीताचं लेणं ल्यालेलं अजरामर नाटक "संगीत मानापमान"! नाटक लावल्या लावल्या ऐकायला मिळालं ते "धैर्यधरांचं" "चंद्रिका ही जणू". माझे गुरु डॉ. रवींद्र घांगुर्डे गुरुजी यांनी साकारलेली धैर्यधरांची भूमिका आणि धैर्यधरांची सर्वच पदे आम्हां सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक सुखद पर्वणीचं असते. "मा. दीनानाथ मंगेशकर" यांनी साकारलेली धैर्यधरांची भूमिका, आणि धैर्यधरांची पदे, यांबद्दल आम्ही आमच्या गुरुजींकडून नेहमीच ऐकत आणि शिकत असतो. मा. दीनानाथ मंगेशकरांचा अलौकिक दैवी सुर साऱ्या विश्वावर राज्य करीत आहे. "चंद्रिका ही जणू...

जादू

बऱ्याच दिवसांनी भेटलो होतो त्या दिवशी. बोलायचंच नाही मुळी तुझ्याशी असं ठरवलं होतं मी. येशील तू समोर आणि मी अश्शी रुसून बसेन. बघणार ही नाही तुझ्याकडे. तू ही मग नाराज होशील. नजरेच्या कोपऱ्यातून मी हळूच बघेन तुला. उतरलेला चेहेरा तुझा बघून वाईट वाटेल मला. चेहेऱ्यावर गोड हसू आणून हळूच बघेन मी तुझ्याकडे. तू ही मग हसशील. खोट्या आवेगाने माझ्याकडे बघशील. तुझी ती नजर चुकवून मी पण मग तुझ्या बाहुपाशात हरवून जाईन. उंच आहेस ना तू खूप. मी बुटकी आहे म्हणून नाराज होईन मी. आणि "अगं वेडे तू अशीच खूप सुंदर दिसतेस" असं म्हणून तू माझी समजूत घालशील. माझे लांबसडक केस तूझ्या हाताने हलकेच मोकळे करून तू बघत राहशील फक्तं त्यांच्याकडे. मधूनच एखादी बट चेहेऱ्यावर आलीच जर माझ्या तर तिलाही तुझ्या बोटाने अलगद मागे सारून माझ्याकडेच बघत बसशील तू. पापणीही नं लवता. आणि "असा का बघतोयस तू माझ्याकडे?" असं म्हणून मी हलकेच माझ्या दोन्ही हातानी माझा चेहेरा झाकून घेईन. मग आवेगात माझे हात बाजूला सारून माझ्या चेहेऱ्यावरचे हावभाव टीपशील तू. डोळे मिटलेलेच असतील माझे लाजेने. हळूच मला ओढून घेशील तुझ्याजवळ. आणि.. आणि...

शब्दांचीच रत्ने

Image
संगीत आणि साहित्य (त्यातही खास कविता) दोन्ही माझे जीव की प्राण आहेत! अर्थातच कालची सावनी ताईची शब्दांचीच रत्ने ही मैफिल एक विलक्षण आनंद देऊन गेली. मराठी कवींच्या अजरामर कविता आणि सुमधुर गीतांचा एक बहारदार नजराणाच होता तो. खरंतर सावनी ताईकडून कोणतंही गाणं ऐकलं तरी ते प्रत्येक वेळी नवीनच वाटतं. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन खुबी उलगडून दाखवते ताई. गुलाबी रंगाच्या नाजूक पाकळ्या रांगोळीवर अलगद पसरत जाव्यात तशीच अलगद पणे एक एक गाणं ताई सादर करते. आणि प्रत्येक गाण्यासरशी रसिकांच्या मनामध्ये अलगद घर करते. मग ते भावगीत - भक्तीगीत असो, चित्रपट संगीत असो, अनप्लग्ड व्हर्जन असो किंवा ठसकेदार लावणी असो. यातल्या कोणत्याही बाजाचं गाणं ताईकडून ऐकताना त्यातलं नावीन्य मनाला भावतं! ताईचे साथीदार नितीन दादा, अनय दादा, अभिजीत दादा हे देखील त्यांच्या लकबींमुळे रसिकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करतात. पण कालची मैफिल मात्र वेगळीच होती. मैफिलीचा मूळ गाभच मुळी निराळा होता. अजरामर कवीच्या अजरामर कविता आणि सुमधुर गीतांचा नजराणा! सावनी ताईची एक सुंदर कल्पना. हे शिवधनुष्य ताई एकदम समर्थपणे पेलते. आणि सोबतीला कोरस ...

कैवल्यगान

असं म्हणतात की आपल्यासारखंच समांतर जीवन लाभलेलं कुणीतरी आल्याशिवाय माणसाला मोक्ष मिळत नाही. जोपर्यंत असं कोणी येत नाही तोपर्यंत ही जीवनयात्रा अशीच चालू राहते. प्रतीक्षा करत करत. की अपेक्षा करत करत? अनेक क्षयही होतात. पण मोक्ष की काय म्हणतात ना त्याची वाट बघताना असे कितीतरी जन्म घ्यावे लागतात. जीवनचक्राच्या रगाड्यात गुरफटून जावं लागतं, फक्तं मोक्षाच्या अपेक्षेत! ऐहिक! परलोकापासून लांब करणारा आणि इहलोकी गुंतवणारा एक धागा! प्रीतीचे, कीर्तीचे असे अनेक पाश असतात, ज्यात अडकून पडतो आपण. हे हि एका प्रकारचं ऐहिकच असतं ना? या ऐहिकाचा मोह जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत परतत्त्वाचा स्पर्श होत नाही. आणि जेव्हा तेच परतत्त्व स्पर्शू लागतं तेव्हा युगांपासून जोडलेली नाती, जमवलेली संपत्ती, जुळलेले (मैत्रीचे, प्रीतीचे) धागे, पाहिलेली - रंगवलेली स्वप्नं, सुख - दुःख - राग - लोभ - द्वेष - मत्सर अश्या अनेक भावना, मनातल्या सर्व कल्पना या सगळ्यांचं संचित क्षणार्धात नजरेसमोरून तरंगत जातं. पण तेव्हा.. तेव्हा मात्र सगळेच पाश तुटलेले असतात. आणि नवीन वाटचाल सुरु झालेली असते. फरक एवढाच की बाकी भौतिक वाटचालीप्रमाणे हि न...